TY - GEN AU - Deshpande, Dr. Sagar TI - दुर्दम्य आशावादी डॉ रघुनाथ माशेलकर (Durdamya Ashawadi Dr Raghunath Mashelakar) SN - 9788196004408 U1 - 658 PY - 2023/// CY - Pune PB - Sahyadri Prakashan KW - Dr. Raghunath Mashelkar N2 - काही माणसं खूप मोठी असतात, पण त्यांचं मोठेपण कशाकशात असतं हे बऱ्याचदा नेमकं माहीत नसतं. एका उच्चपदावर ही माणसं काम करत असतात; पण ते पदही नेहमीचं नसतं. तिथल्या कामाचं स्वरूप, तिथल्या अडचणी, या माणसांनी त्या पदावर आल्यावर केलेले बदल, कामाला मिळालेली उंची हे आपल्याला समजत नाही. कारण त्यांचं क्षेत्रच वेगळं असतं. सामान्य माणसं या माणसांच्या नावाने भारावून गेलेली असतात. त्या भारावलेपणात श्रद्धा असतेच. अशा वेळी अशी मोठी, नामवंत माणसं समजण्यासाठी त्यांचे चरित्र, आत्मचरित्र खूप मदत करते, नव्हे आपल्या मनातल्या श्रद्धेला अधिक बळकटी येते, डोळसपणा येतो. असेच एक चरित्र म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे. डॉ. सागर देशपांडे यांनी लिहिलेले नि नुकतेच प्रकाशित झालेले चरित्र ‘दुर्दम्य आशावादी’. हे चरित्र माझ्यासारख्या माणसाला डॉक्टर माशेलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवते. सामान्यत: प्रसिद्ध, समाजाला माहिती असलेल्या क्षेत्रातल्या व्यक्तीचे चरित्र आपण वाचतो ते त्याच्या व्यक्तिगत जीवनात डोकावून पाहायची आपली इच्छा असते. खेळ, सिनेमा, छोटा पडदा, राजकारणी, लेखक, कलावंत यांच्या चरित्रापेक्षा हे चरित्र वेगळे आहे. कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला विज्ञानाचे क्षेत्र आणि त्यातील संशोधन, त्यातील काम आणि कामाचे बारकावे इ.विषयी फारसे ज्ञान नसते. त्यामुळे डॉ. माशेलकर म्हणजे हळदीचे पेटंट हे फक्त माहीत होते; पण या चरित्रामुळे त्याचा इतिहास, पेटंट म्हणजे काय अशा अनेक गोष्टी मी समजून घेतल्या ER -